¡Sorpréndeme!

Beed | जिल्हा प्रशासनाचा सावळा गोंधळ, कोरोना मृतांच्या यादीत जिवंत व्यक्तीचा समावेश

2021-12-25 2 Dailymotion

कोरोना काळात मृत्यू झालेल्या यादीतील एक व्यक्ती जिवंत आढळला आहे. जिवंत व्यक्तीचा समावेश मृतांच्या यादीत असल्याचा प्रकार अंबाजोगाईत उघडकीस आला आहे. अंबाजोगाईच्या प्रशांतनगर भागातील नागनाथ काशिनाथअप्पा वारद हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यादरम्यान त्यांच्यावर उपचार होऊन त्यांना घरी पाठविण्यात आले. मात्र त्यांचे नाव थेट मृतांच्या यादीत आल्याने ते पुरतेच गोंधळून गेले.